Nagar Urban : ‘नगर अर्बन’ घाेटाळ्यातील आराेपींना अटक करा; ठेवीदारांचा पाेलीस अधीक्षक कार्यालयावर माेर्चा

    161

    नगर : नगर अर्बन (Nagar Urban) बँकेमध्ये झालेल्या विविध अफरातफरी बोगस कर्ज प्रकरण (Fake loan case) संबंधी कार्यक्षेत्रात दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना तातडीने अटक करा, त्यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांचा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

    यावेळी बँकेचे जागरूक सभासद राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, भैरवनाथ वाकळे, संध्या मेढे, अँड.अच्युतराव पिंगळे, एस.झेड. देशमुख आदी उपस्थित हाेते.

    निवेदनात म्हटले आहे की, ११३ वर्षाचे जुने वैभवशाली बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी रद्द केला. त्यामुळे ठेवीदारांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे. वास्तविक पाहता बँकेतील चेअरमन, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी हे विविध घोटाळे करत असल्याचे निदर्शनास आले. परंतु, दुर्दैवाने पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे बँकेच्या सभासदांना उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करावी लागली. खंडपीठाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु, खात्याकडून कोणत्याही संचालकाला ताब्यात घेतले गेले नाही. तरी संबंधित सर्व आराेपींना तातडीने अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी, अन्यथा येत्या पंधरा दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here