Teacher Constituency : आवाहन; शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नाेंदणी करावी

    147

    नगर : मुंबई व नाशिक विधानपरिषद (Legislative Council) शिक्षक मतदारसंघा (Teacher Constituency) साठी मतदार नोंदणी (Voter registration) चा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर व २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.

    मतदार नोंदणीसाठी मतदार हा भारताचा नागरिक असावा. मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षातील किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक असावा. मतदार म्हणून नोंदणीसाठी रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना आदी), विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र, कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संबंधित कायदेशीर पुरावा जोडावा.

    मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज क्र. १९ भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्वयंसाक्षांकित व पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून अधिप्रमाणित करुन जोडणे आवश्यक आहे. नोंदणीसाठीचा अर्ज हा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here