Leopard : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद

    195

    कोपरगाव: येथील बसस्थानक परिसरात मादी बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घालत तिघांना जखमी केले होते. या मादी बिबट्यास अथक पाच तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला (Forest Department) यश आले आहे. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या जेरबंद झाल्याने कोपरगाव(Kopargaon)करांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

    सदर मादी बिबट्या चारही बाजूने बंद असलेल्या एका कंपाउंड मध्ये लपलेली होती. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच, या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संगमनेर येथून वनविभागाचा शीघ्र मित्र दलाला पाचारण करण्यात आले होते. अथक पाच तास प्रयत्न केल्यानंतर वनविभागाला त्या मादी बिबट्याला जेरबंद करता यश आले. यावेळी वनविभागाच्या मदतीला कोपरगाव शहर व तालुका पोलीस दल, नगरपालिका कर्मचारी धावून आले होते.

    यावेळी आमदार आशुतोष काळे, तहसीलदार संदिपकुमार भोसले, वनपरिक्षेत्राच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे, पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नगरपालिका तहसीलचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here