
अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँकेचे लायन्सन्स रिझर्व्ह बँकेने कॅन्सल केले आहे. मागील अनेक दिवसांपासून ही बँक चर्चेत होती. अनेकप्रकरणांची तपासणी सुरू होती.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अटी-शर्तीचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो.आता नगर अर्बन बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.




