
Ahmednagar राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. या ग्रामपंचायतींसाठी पाच नोव्हेंबरला मतदान, तर सहा नोव्हेंबरला मतमोजणी होईल. निवडणुकीसाठी 16 ते 20 ऑक्टोबरला उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील, तर अर्ज 25 ऑक्टोबरला मागं घेता येणार आहेत. अकोले 24, संगमनेर सात, कोपरगाव 17, राहाता 12, श्रीरामपूर 17, राहुरी 22, नेवासे 16, नगर तालुका सात, पारनेर आठ, पाथर्डी 16, शेवगाव 27, कर्जत सहा, जामखेड तीन आणि श्रीगोंद्यातील 10 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल.
अकोले : कोभाळणे, पैठण, जहागिदरावाडी, बारी, साम्रद, रतनवाडी, मुतखेल, शिसवद, पाचनई, अंबित, पेंडशेत, वांजुळशेत, रेडे, सुगाव बुद्रुक, गर्दणी, कौठवाडी, पिंपळगाव नाकविंदा, आंबेवंगण, देवगाव, एकदरे, तिरडे, कोकणवाडी, पाचपट्टावाडी, घोटी, पेढेवाडी, पिंपळदरावाडी, खानापूर आगार.संगमनेर : गुंजाळवाडी, ढोलेवाडी, आश्वी खुद्रुक, आश्वी बुद्रुक, बोरबन, घारगाव, पिंपळगाव कोझीरा.कोपरगाव : कुंभारी, घोयेगाव, ब्राम्हणगाव, वारी, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहेगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहजापूर, मंजुर, कान्हेगाव.राहाता : दहेगाव को-हाळे, को-हाळे, निमगाव को- हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, वाकडी, दाढ बुद्रुक, पिंपरीनिर्मळ, कनकुरी, रुई, पुणतांबा – रस्तापूर, चितळी.श्रीरामपूर : उंदिरगाव, शिरसगाव, उक्कलगाव, निमगाव खैरी, भोकर, फत्याबाद, खिर्डी, कान्हेगाव, गुजरवाडी, माळवड्गाव, दत्तनगर, भैरवनाथनगर, जाफराबाद, नाऊर, दिघी, रामपूर, कडित बुद्रुक.राहुरी : कानडगाव, चिंचोली, पिंप्री वळण, निंभेरे, सडे, डिग्रस, शिलेगाव, दरडगाव थडी, मोमिन आखाडा, घोरपडवाडी, धामोरी बुद्रुक, धामोरी खुद्रुक, म्हैसगाव, देसवंडी, तमनर आखाडा, गंगापूर, बारागाव नांदूर, ब्राम्हणी, माहेगाव, मालुंजे खुद्रुक, मुसळवाडी, टाकळी मिया.नेवासे : करजगांव, पानेगांव, देडगांव, पाचेगांव, फत्तेपुर, रस्तापूर, कौठा, शहापुर, पिचडगांव, भानसहिवरा, खुणेगांव, नागापूर, जैनपुर, सौंदाळा, पानसवाडी, मुकिंदपूर.शेवगाव : हिंगणगावन-ने, देवटाकळी, शहरटाकळी, बालमटाकळी, ढोरसडे अंत्रे, मुंगी, क-हेटाकळी, खरडगाव, थाटे, बोधेगाव, वडुले खुद्रुक, वरुर बुद्रुक, भगुर, लोळेगाव, सामनगाव, एरंडगाव भागवत, लाखेफळ, एरंडगाव समसूद, वडुले बुद्रुक, खडके, मडके, लाडजळगाव, आव्हाणे बुद्रुक, ब-हाणपूर, दिवटे, शेकटे खुद्रुक, गोळेगाव.
पाथर्डी : ढवळेवाडी, सैदापूर, हत्राळ, डमाळवाडी, जवखेडे खालसा, कासारवाडी, धारवाडी, गितेवाडी, पाडळी, दगडवाडी, डांगेवाडी, साकेगाव, रेणुकाईवाडी, डोंगरवाडी, चिचोंडी, करंजी.जामखेड : मुंजेवाडी, मतेवाडी, जवळा.कर्जत : कुंभेफळ, वायसेवाडी, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, करमणवाडी.श्रीगोंदे : विसापूर, अधोरेवाडी, पेडगाव, आनंदवाडी, कोळगाव, देवदैठण, मढेवडगाव, टाकळी लोणार, लोणी व्यंकनाथ, घुटेवाडी.पारनेर : विरोली, यादववाडी, मावळेवाडी, काकनेवाडी, वाडेगव्हाण, कान्हूरपठार, जामगांव, निंबोडी.नगर तालुका : बारदरी, मेहेकरी, हिवरेझरे, अरणगाव, देऊळगाव सिध्दी, हिंगणगाव, वडगाव गुप्ता.