बेजाबदारपणे वार्तांकन करणाऱ्या वाहिन्यांविरोधात ‘बॉलिवूडची मंडळी’ कोर्टात:बेजबाबदार बातमीदारीचा ठपका

अभिनेता शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी ‘बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात’ बॉलिवूडची मंडळी नी कोर्टात याचिका दाखल केली आहे. प्रकरण काय? :

▪️ खान मंडळींच्या प्रोडक्शन हाउसेससह इतर काही प्रोडक्शन हाऊसेसनी रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

▪️ ज्यांच्यावर याचिका दाखल केली त्यांनी मागील 2 महिन्यांमध्ये बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचं काम केले असल्याचं याचिकेत म्हटले आहे. त्यांच्यावर बेजबाबदार बातमीदारीचा ठपका ठेवला आहे.

▪️ डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात करण्यात आल्याने बॉलिवूडची बदनामी झाली असून हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असे याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्ते कोण? : शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेस तसेच ‘द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया’ आणि ‘सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ यांनी हि याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, या 4 जणांविरोधात आणि 2 चॅनल्स विरोधात दिल्लीतील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here