मुंबई – मुंबईतील मुलुंड भागात कार्यालयासाठी भाड्यानेजागा घेण्यासाठी गेलेल्या मराठी तरुणीला ‘इथे महाराष्ट्रीयनअलाउड नाही’, असे म्हणत धक्काबुक्की केली. खुद्दमहिलेनेच याबाबत सांगितले. या पार्श्वभूमीवर राजकीयक्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटल्या. त्यातच आताभाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपला अनुभव सांगितला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, शासकीय बंगला सोडल्यानंतर मी मुंबईत घर शोधायला गेले, तेव्हा मलादेखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आलं होतं. मराठी लोकांना आमच्या भागात घर देत नाही, हे शब्द मीदेखील अनुभवले आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी असे प्रकार घडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.दरम्यान हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्य करत नाही. परंतु सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडिओ टाकला तो संताप आणणारा आहे. राज्यात सध्या आरक्षणावरून वेगवेगळे समाज समोरासमोर येत आहेत, जाती-जातीमध्ये भांडणे सुरू झाल्याचं पंकजा यांनी म्हटलं.
एकीकडे सगळी सुबत्ता आहे, सोयी आहेत, गाड्या आहेत तरी समाजामध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे समाज वेगवेगळ्या रंगात वाटला गेला आहे, हिरवा, पिवळा, निळा, भगवा. कधी कधी वाटतं एका चक्रावर हे सगळे रंग एकत्र करून फिरवली तर त्यातून पांढरा रंग तयार होतो. पांढरा रंग हा शांततेच प्रतीक आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहून मन अस्वस्थ होतं, असंही पंकजा यांनी नमूद केलं.मुंबईतील घटनेवर विविध राजकीय पक्षांनी संताप व्यक्त करत झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही ही घटना अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे.
नगर : राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या तापला आहे. राज्यातल्या धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) प्रश्नावर आज राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री...
राहुरी तालूक्यातील असलेल्या पश्चिमे ला शेरी चिखलठाण येथील शेरी या ठिकाणीं असलेल्या*अंगणवाडीमध्ये (क्र.६०) येथे पल्स पोलीओ लसीकरण करण्यात आले*.*पोलीओ लस ही...