गावातील यात्रेमुळे काय झाले ते वाचा व मंथन करा माणगाव न्यायालयाचा निर्णय

    166

    सातारा जिल्यातील मानगांव न्यायालयाचा दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत झणझणीत अंजन घालणारा निर्णय निर्णय १७ आरोपींना जन्मठेपआज मांणगाव सेशन कोर्टाने रोहा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या ४२/२०१२ या गुन्ह्यातील खटल्यात महत्वपूर्ण अशी सुनावणी केली*रोहा-मेढा-पाले* गावातील पालखी उस्तवाच्या दिवशी दोन पक्षांचे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकमेकांवर तलवारी, सुरे, लाठ्या ,काठ्या इ. घातक शस्त्रास्त्रांनी वार, दुखापती करताना पक्षाचे कट्टर कार्यकर्ते सुधीर खांडेकर, निवृत्ती खांडेकर यांच्या पोटात दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तलवारी सुरे अश्या शस्त्रांनी वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते तर एकनाथ खांडेकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता…..सदर प्रकारातील घटना अशी कि, गावातील दोन राजकीय पक्ष वाद वाढत जाऊन ऐन पालखीच्या दिवशी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले कार्यकर्त्यामधे हाणामारी होऊन सदर प्रकार घडला होता. त्यानंतर माणगाव कोर्टात सलग ३ वर्षे चाललेल्या खटल्यात आज कोर्टाने एकूण १७ आरोपींना *जन्मठेपेची शिक्षा* (१४ वर्षे सक्तमजुरी) सुनावली. सदर सुनावणी नंतर आरोपिच्या नातेवाईकांनी व मित्रांनी रडून केलेला *आक्रोश* पाहून खरच मन सुन्न झाल. विशेष म्हणजे ज्या पक्षा साठी हे झाल त्या दोन्ही पक्षांचे कोणीही नेते सुनावणीला *उपस्थित नव्हते*…म्हणून मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती कि, या अश्या अनुभवातून काय तो योग्य बोध घेऊन आपण आपली मैत्री, भावबंदकी जपून आपला एकमेकांचा विकास साधुया.. वास्तविक पाहता कोणत्याच पक्षाला तुमच्या माझ्या सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या *खाजगी आयुष्याशी* काहीही घेण-देन नसत…हा तुमची तयारी असेल ह्या अश्या प्रकारांना समोर जायची तर..करा जे मनात येयील तस….पण विचार करा तिचा रोज घरी तुमची वाट पाह्णाऱ्या *पत्नीचा*. विचार करा त्या *तान्हुल्या बाळाचा* ज्याच्या साठी तुम्ही आयुष्यभर खस्ता खायला तयार असता…विचार करा त्या *आई बापाचा* जे तुमच्या साठी जीव टाकत असतात….आणि आपण बघा या आपल्या जीवाभावाच्या मंडळी कडे लक्ष द्यायचं सोडून *पक्षाचे झेंडे* खांद्यावर घेऊन उगाच मिरवत बसतो.खरच जरा विचार करा गाव सोडून आपल्याला बाहेरच्या जगात कोण विचारताय काय??? *काय किंमत आहे* आपल्याला बाहेरच्या जगात.??? १५ ते १६ हजाराच्या नोकरी साठी /कामासाठी आपण काय जीवाच रान करतो आपलं आपल्यालाच माहित 5 ते 10 हजार सो कॉल्ड राजकारणी क्षुल्लक गोष्टीवर उडवतात….सरकारी कामात थुक लावून गब्बर पैसा कमवतात…फक्त आपल्या *सपोर्ट* वर..पण जेव्हा अश्या जीवघेण्या घटना घडतात *तेव्हा कुठे असतात हे पक्ष* …सांगा न शेका पक्षाचे , राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेत्यांना याचा काय फरक पडला….फरक पडला तो शिक्षा झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना….*आणि ज्यांनी यात जीव गमावला त्याचं काय*..?आजतागायत सगळी *फायद्याची पदे* राजकीय पुढाऱ्यानी स्वताच्या घरातच ठेवली. त्यांची पोर लेकी, सुना यांन निवडून आणायला आपण एकमेकांचे *दुश्मन* बनतो. म्हणून या पुढे कुठल्या पक्षासाठी नको तर फक्त आपल्या एका हाकेवर आपल्या मदतीला धावून येणाऱ्या मित्रांसाठी एकत्र या….सत्कार्यासाठी एकत्र या.! गावासाठी देशासाठी एकत्र या.! लक्षात घ्या आपल्या प्रत्येक सुख दुखात आपले कुटूंब नातेवाईकयह शेजारी आणि *मित्रच* आपल्या पाठीशी असतात ..दुसर कोणी नाही।*सावधान**मटणाच्या एका चूऱ्यासाठी – दारूच्या एका थेंबासाठी – पुढाऱ्यांच्या दारात रांगोळी घालणाऱ्यानो – ताटं वाट्या भांडी धुणाऱ्यानो सावधान* *सावधान कार्यकर्त्यांनो साहेब दादा काका भाऊ भैय्या या शब्दापासून सावधान**असं काही आपल्या भागात होत नाही ना काळजी घ्या लोकांच्या बापासाठी मिश्या काढू नका*

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here