Asian Games : नगरचा ‘आदित्य’ आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकणार

    151

    नगर : चीनमध्ये हँग जुई येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games) नगरच्या (Ahmednagar) आदित्य संजय धोपावकर याची भारतीय कुराश संघात निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत सहभागी होणारा तो नगरचा वैयक्तिक खेळातील एकमेव खेळाडू आहे.हाँगजुई येथे 23 सप्टेंबरपासूनआशियाई स्पर्धा सुरू झाल्या आहेत. भारताने 45 क्रीडा प्रकारात 600 खेळाडूंनी भाग घेतला आहे. कुराश या खेळाचा या स्पर्धेत समावेश आहे. आदित्य हा 81 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्यासह भारतीय  संघात तीन मुलगे, तीन मुलींचा समावेश आहे. दिल्ली व भोपाळ येथे झालेल्या दोन निवड चाचण्यांमधून आदित्यची निवड झाली आह़े. 

    आदित्यने कुराश व ज्युदो या खेळांमध्ये ३० पैक्षा अधिक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकलेली आहेत तर कुराश या खेळात तीन आशियाई आणि एक जागतिक अश्या चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी  होताना दोन रौप्य पदके जिंकली आहेत. बाकी स्पर्धेत त्याने पाचवा क्रमांक मिळवला आहे. आदित्य हा 2012 पासून यंग मेन्स असोसिएशनच्या सिद्धीबाग ज्युदो हॉलमध्ये कुराश व ज्युदोचा सराव करतो. त्याला त्याचे वडील राष्ट्रीय कीर्तीचे क्रीडा मार्गदर्शक प्रा. संजय  धोपावकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

    कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे खजिनदार अंकुश नागर यांनी आदित्यचा गौरव केला. आदित्य हा चीनला 27सप्टेंबरला रवाना झाला. त्याची स्पर्धा रविवारी (ता. १ ऑक्टोबर) होणार आहे. या स्पर्धेत तो भारतासाठी निश्चितच पदक मिळवून देईल, असा विश्वास भारतीय संघाला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here