Big Boss 2020 : प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलाची होणार एण्ट्री?

809

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोकडे पाहिलं जातं. आतापर्यंत या शोचं प्रत्येक पर्व चर्चेचा विषय ठरलं आहे. परंतु, यंदाचं १४ वं पर्व सुरु होण्यापूर्वीच चर्चेत आलं आहे. यंदाच्या पर्वात अनेक बदल करण्यात आले असून यात अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यातच प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूदेखील सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

यंदाच्या पर्वात कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सहभागी होणार आहे. जान हा २६ वर्षांचा असून त्याचं खरं नाव जयेश भट्टाचार्या आहे. परंतु तो त्याच्या नावापुढे कुमार सानू असं वडिलांचं नाव लावतो. विशेष म्हणजे जान कुमार सानूदेखील वडिलांप्रमाणे एक क्लासिकल ट्रेंड सिंगर आहे. जान हा कुमार सानू यांच्या पहिल्या पत्नीचा रीता यांचा मुलगा आहे. सध्या जान आणि कुमार सानू एकत्र राहत नसल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, जानने ‘तारे जमीनपर’ चित्रपटातील ‘बम बम बोले’ या गाण्याला आवाज दिला आहे. तसंच काही बंगाली चित्रपटांसाठीही त्याने गाणी गायली आहेत. यंदाच्या पर्वात अनेक विविध बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वाचं नाव देखील बदलण्यात आलं आहे. ‘बिग बॉस १४’च्या जागी ‘बिग बॉस 2020’असं यंदाच्या पर्वाचं नाव आहे. या पर्वात सारा गुरपाल, निया शर्मा, जॅस्मीन भसून, पवित्रा पुनिया आणि नैना सिंह या अभिनेत्री सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here