
Mumbai Picnic Spot : काल अर्थातच 25 सप्टेंबरला भारतीय हवामान खात्याने पश्चिम राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. तसेच पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. साधारणता 5 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. अर्थातच आगामी काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे, मानसून आता निरोप घेणार आहे.खरंतर पावसाळा हा पर्यटनासाठी महत्त्वाचा ऋतू आहे. पावसाळ्यात पर्यटक वेगवेगळ्या पिकनिक स्पॉटला भेट देतात. फिरण्याचा आनंद घेतात. पण जर तुम्ही पावसाळ्याच्या सरतेशेवटी पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.
आज आपण मुंबई जवळील पाच पिकनिक स्पॉटबाबत माहिती जाणून घेणार आहोत. ज्या लोकांनी यंदा कुठे पिकनिक काढली नसेल ते लोक या ठिकाणी जाऊन मनमुराद आनंद घेऊ शकतात.विशेष म्हणजे मुंबई जवळील हे ठिकाण मनालीपेक्षा कमी नाहीत. यामुळे जर तुमचाही मनालीचा प्लॅन कॅन्सल झाला असेल तर तुम्ही या पिकनिक स्पॉटला भेट देऊन स्वस्तात मनाली ट्रिपसारखाच आनंद घेऊ शकतात. स्वर्गाचीच जाणीव करून देते. या ठिकाणी येणारे पर्यटक कधीच उबगणार नाहीत. एकदा या ठिकाणाला भेट दिली की वारंवार या ठिकाणी जावेसे वाटते. यामुळे जर तुम्हीही पावसाळ्याच्या सरते शेवटी फिरण्याचा प्लॅन आखात असाल तर भिवपुरी हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण राहणार आहे.
चिंचोटी : या ठिकाणी देखील सुंदर धबधबे आहेत. येथे पोहोचण्यासाठी हिरव्या झाडाझुडपांच्या दाटीतून जावं लागतं. यामुळे जर तुम्हाला जंगल सफारी सारखा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठिकाण राहणार आहे. स्वस्तात मस्त जंगल सफारी आणि मनमोहक धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी चिंचोटी हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष फायद्याचे राहणार आहे. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे, आहेत. पण मुख्य धबधब्याजवळपोहोचायला तासभर चालून जावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर कामन जंक्शन जवळ हे ठिकाण आहे. जर आपण ट्रेनने जात असाल तर तुम्हाला नायगाव स्टेशनला उतरावं लागेल आणि तेथून मग तुम्हाला रिक्षाने जाता येईल. निश्चितच पावसाळा आता सरत चालला आहे यामुळे जर तुम्हाला स्वस्तात जंगल सफारीसारखा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही चिंचोटीला भेट दिली पाहिजे.
तुंगारेश्वर : खरंतर पावसाळा हा : पर्यटकांसाठी खूपच आनंदाचा ऋतू आहे. पावसाळ्यात नदी, डॅम, धबधबे पाहण्यासाठी लोक खूप गर्दी करतात. जर तुम्हाला नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणांचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी तुंगारेश्वर हे ठिकाण सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. मुंबईपासून जवळपास दोन तासाच्या अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे. येथे मात्र पर्यटकांचे जेवणाचे हाल होऊ शकतात. यामुळे जर तुम्ही तुंगारेश्वरला जात असाल तर जेवणाची व्यवस्था घरूनच करून जा.झेनिथ : खोपोली शहरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. झेनिथ हे एक धबधब्याचे ठिकाण आहे. मात्र येथील धबधब्याचा पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. यामुळे येथे जात असाल तर यथायोग्य काळजी घ्या. रिस्की गोष्टी करू नका. या ठिकाणी आजूबाजूला जेवणासाठी विविध धाबे तुम्हाला मिळून जातील.
गाढेश्वर : पनवेल तालुक्यातील गाढेश्वर नदीकाठी पावसाळ्यात फिरण्याचा आनंद शब्दबद्ध करता येणार नाही. ज्यांना पावसाळ्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घ्यायचा असेल ते येथे जाऊ शकतात. या ठिकाणी पर्यटक आवर्जून येतात. दरवर्षी येथे असलेल्या नदीकाठी पर्यटक मोठी





