BJP : भाजपचे खोटारडे राजकारण फार काळ चालणार नाही: आमदार कानडे

    153

    श्रीरामपूर : जातीजातीत भांडणे लावणे, नागरिकांना खोटी आश्वासने तसेच खोटा प्रचार करून सत्ता मिळविण्याचे भाजपचे (BJP) काम आहे. मात्र, हे खोटारडे व जातीपातीचे राजकारण (politics) फार काळ चालणार नाही. राज्यात पुन्हा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ची सत्ता येईल, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला.

    श्रीरामपूर मतदार संघातील राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे जनसंवाद यात्रेदरम्यान आयोजित बैठकीत आमदार कानडे बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अंकुश कानडे, माजी नगरसेवक अशोक कानडे, राहुरी बाजार समिती संचालक रखमाजी जाधव, नानासाहेब रेवाळे, अशोक भोसले, लोकनियुक्त सरपंच अमृत धुमाळ, उपसरपंच किशोर जोशी, अ‍ॅड. रावसाहेब करपे आदी उपस्थित होते.

    आमदार कानडे म्हणाले, केंद्र सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस होत असून प्रत्यक्षात काही होत नाही. हे सरकार केवळ उद्योजकांसाठी आहे. ठराविक उद्योजकांसाठी वंचित तसेच गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. मुळ प्रश्नांना बगल देऊन नागरिकांना खोटी आश्वासने तसेच खोटा प्रचार करून सत्तेत येण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्राने विशेष अधिवेशन बोलावून घाईघाईने महिला विधेयक पास करून घेतले असले तरी पुढील काही वर्षे ते अमलात येईल, असे वाटत नाही. 


    यावेळी मुसळवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच ग्रामपंचायतीच्या आरो प्रकल्पाचे उद्घाटन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुदाम भुजाडी, अशोक नामदेव भुजाडी, ग्रामपंचायत सदस्य रोहन भुजाडी, अशोक गल्हे, शिवाजी घोलप, सतीश धुमाळ, मनोहर सावंत, अशोक सोपान भुजाडी, लक्ष्मण भुजाडी, बाळासाहेब सावंत, सचिन धुमाळ, प्रकाश धुमाळ, अशोक धुमाळ, गणेश महाराज सजगुरे, जगन्नाथ नरसाळे, सुरेश धुमाळ, राम शेरकर, जालिंदर घोलप, एकनाथ धनगर, अरुण करपे, प्रकाश करपे, एकनाथ धनगर, ग्रामसेवक भाऊसाहेब कारले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हिरामण गुंड आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here