मीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेन :प्रमोद सावंत

पणजी – गोवा विधानसभेच्या सन 2022 साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मीच भाजपचा, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
ते म्हणाले की, भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी तशी घोषणा बैठकीत केली असल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे.
आमच्या सरकारच्या कामाच्या जोरावर आम्ही गोव्यातील 40 पैकी किमान 30 जागा निश्‍चित जिंकू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि या रोगाला बळी पडलेल्यांच्या उपचारासाठी राज्य सरकारने भरीव कामगिरी केली आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. गोव्यात करोनाग्रस्तांना देशातील सर्वात चांगली आरोग्य व्यवस्था देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here