
श्रीगोंदा : तालुक्यात गणेश उत्सव (Ganesh Festival) व ईद ए मिलाद (Eid e Milad) सणाच्या अनुषंगाने शहरातील दहा जणांना दहा दिवस प्रवेश बंदी (Entry ban) करण्यात आल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीगोंदा यांनी १८ सप्टेंबर २०२३ काढला.
याबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सिद्धार्थ चौकात दोन समाजामध्ये भांडण झाले होते. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलिसच फिर्यादी होत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांतता, कायदा सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी जुगल जीवा घोडके, दिपक राहूल घोडके, ऋषिकेश जीवा घोडके, अमोल राहूल घोडके, मयूर संजीवन घोडके, हेमंत रामभाऊ कोथंबिरे, प्रविण रामभाऊ कोथंबिरे, रोहन रामदास होले, महेश चंद्रकांत कोथंबिरे, अनिकेत संतोष कोथंबिरे या दहा जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश बंदी बाबत प्रस्ताव दाखल केला होता.
यानुसार श्रीगोंदा उपविभागीय दंडाधिकारी पद्माकर गायकवाड यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या भौगोलिक हद्दीत १८ सप्टेंबर २०२३ पासून २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार बंदीचे आदेश केले. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विकेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




