
नगर : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच आपल्या घायाळ अदांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. नुकत्याच नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडीच्या उत्सवात सुद्धा गौतमीच्या नृत्यावर तरुणाई थिरकल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूसमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचं कार्यक्रमात गौतमीचा स्टेजवरच तोल गेल्याचं पाहायला मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूसमध्ये पृथ्वी-संग्राम युश फाऊंडेशनतर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. यावेळी नृत्य सादर करता असताना अचानक गौतमीचा पाय घसरुन स्टेजवरच तोल गेला. मात्र लगेचच तिने स्वत:ला सावरलं आणि डान्स पुन्हा सुरू केला आहे. या मानाच्या दहीहंडीसाठी १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रुपये बक्षीस होतं. तसेच सलामी देणाऱ्या प्रत्येक संघाला २५ हजारांचे बक्षीस पृथ्वी-संग्राम युश फाऊंडेशनकडून देण्यात आले होते.
सांगली, कोल्हापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जवळपास सात संघ या दहीहंडी उत्सवाला उपस्थित होते. पलूसमधील पैलवान रोहित पाटील यांनी या भव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. गौतमी पाटीलच्या नृत्यामुळे या दहीहंडी उत्सवाला हजारोंची गर्दी झाली होती. तसेच या गर्दीला आवरण्यासाठी सुरक्षा रक्षकांनाही मोठी कसरत करावी लागली. मात्र गौतमी पाटीलचा नृत्यादरम्यान तोल गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.