गायकर : अगस्ती कारखाना गायक नियमित सुरू ठेवणार: कर

    163

    अकोले : चालू हंगामात बाहेरील (गेटकेनचा) अडीच लाख मेट्रिक टन व कार्यक्षेत्रातील २ लाख मेट्रिक टन अशा एकूण साडेचार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अगस्ति सहकारी साखर कारखाना (Augusti Cooperative Sugar Factory) करेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे जावून पाहिजे ते प्रयत्न करु, मात्र कारखाना बंद पडू न देता नियमित सुरू ठेवू, असा विश्वास अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर (Gaikar) यांनी व्यक्त केला.

    अकोलेतील अगस्तिनगर येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची २०२२-२०२३ (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) या आर्थिक वर्षातील अधिमंडळाची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगस्ती साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीत पार पडली. या सभेत राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर अगस्तिचे अध्यक्ष सीताराम गायकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून सदस्यपदी नियुक्त करावी, अशी सभासद प्रकाश महाले यांनी केलेल्या सूचनेस रावसाहेब भोर यांनी अनुमोदन दिल्यानंतर ठराव टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

    सभेच्या प्रारंभी उपाध्यक्ष सुनीता भांगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सीताराम गायकर यांच्या अध्यक्षीय नावाची सूचना ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. मनोज देशमुख यांनी केली. त्यास संचालक विकास शेटे यांनी अनुमोदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह उपस्थित संचालक व पदाधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण केले व अभिवादन करून सभेची सुरुवात झाली.


    अहवाल वर्षात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणार्‍या १२ ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. मुख्य लेखापाल विजय सावंत यांनी अहवालातील दोष दुरुस्ती व मागील वार्षिक सर्वसाधारण सभा इतिवृत्ताचे वाचन केले. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस यांनी केले. या सभेतील विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर विचार विनिमय झाल्यावर सभासदांनी मंजुरी दिली.


    याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर नवले, उत्कर्षा रुपवते, अमित भांगरे, विठ्ठल चासकर, बी. जे. देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, प्रकाश मालुंजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, मधुकर तळपाडे, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, भाऊपाटील नवले, सेना तालुकाध्यक्ष डॉ. मनोज मोरे, महेश नवले, सोन्याबापू वाकचौरे, मच्छिंद्र मालुंजकर, रावसाहेब वाळुंज, गोरख मालुंजकर, राजेंद्र कुमकर, यमाजी लहामटे, कैलास वाकचौरे, पर्बत नाईकवाडी, मच्छिंद्र धुमाळ, पाटीलबा सावंत, अशोक आरोटे, विकास शेटे, विक्रम नवले यांसह सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here