करोनावर ‘हे’ औषध सापडले

वॉशिंग्टन- करोना विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी लस उपयुक्त आहे. मात्र करोनाची लागण झाली तर त्याने उपचार करता येत नाहीत. मात्र आता अमेरिकेतील एका बायोटेक्‍नॉलॉजी कंपनीने या अडथळ्यावर मात केल्याचा दावा केला आहे. रीजेनेरॉन नावाच्या या कंपनीने एक अँटीबॉडी कॉकटेल तयार केल्याचा दावा केला आहे.
हे कॉकटेल केवळ करोनापासून बचावच करणार नाही तर करोनाची लागण झाल्यावर उपचारासाठीही प्रभावी ठरेल असे कंपनीचे म्हणणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्यावर त्यांना हेच औषध देण्यात आले होते.
सायन्स जर्नलमध्ये प्रसिध्द झालेल्या संशोधन अहवालानुसार माकडांना जेव्हा हे अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले तेव्हा त्यांना करोनाची लागण झालीच नाही. लागण होण्याच्या अगोदर अथवा लागण झाल्यावरही हे औषध अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
माकडांवर जेव्हा या औषधाची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यांना विषाणूच्या संपर्कात आणण्याच्या तीन अगोदर हे अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले होते. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती इतकी अभेद्य झाली की त्यांनी विषाणूला शिरकावच करू दिला नाही. तसेच ज्या माकडांना लागण झाल्यानंतर हे औषध देण्यात आले ती माकडे ज्यांना कॉकटेल देण्यात आले नव्हते, त्यांच्यापेक्षा वेगाने बरी झाली. त्या आधारे लागण होउ नये याची खबरदारी म्हणून आणि लागण झाल्यावर उपचार म्हणूनही हे कॉकटेल उपयुक्त असल्याचा दावा आता केला जातो आहे.
जर हे निष्कर्ष खरे ठरले तर करोनामुळे जी दहशत निर्माण झाली होती, ती प्रचंड वेगाने ओसरण्यास सुरूवात होईल. कारण लस येईल तेव्हा येईल त्या अगोदर त्यावर उपचाराचे खात्रीशीर ओैषध उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here