तात्पुरता खांदेपालट:पासवान यांच्या खात्याचा अतिरिक्‍त भार गोयल यांच्याकडे

नवी दिल्ली – दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे असलेला ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा अतिरिक्‍त कार्यभार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 
गोयल यांच्याकडे सध्या वाणिज्य आणि उद्योग खात्याचाही कार्यभार आहे. हा तात्पुरता खांदेपालट असून नंतर हे खाते लोकजनशक्‍ती पक्षाच्या अन्य खासदाराकडे जाते किंवा कसे याविषयी उत्सुकता आहे. अनुमानानुसार लोकजनशक्‍ती पक्षाचे हे खाते रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे जाण्याची शक्‍यता आहे.
 तथापि, चिराग पासवान हे महिनाभर तरी बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असणार आहेत. त्यानंतरच हा खांदेपालट होईल, असे सांगितले जात आहे. बिहारच्या निवडणुकीत लोकजनशक्‍ती पक्ष हा एनडीए आघाडीत सामील नसला तरी त्यांची केंद्रीय पातळीवरील भाजपशी असलेली सलगी कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here