पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींंचं ड्रग्स जप्त, पाच आरोपी अटकेत ड्रग्स कनेक्शन मागे मोठी टोळी असल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत. आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊ आणि मग त्या चौकशीत याचा छडा लावला जाईल, असा पोलीस आयुक्तांनी दावा केलाय. हे ड्रग्स कुठून आणि कशासाठी आणलं गेलं याबाबत आता विविध तर्क लावले जातायेत. बॉलिवूडचे लक्षही याकडे लागून राहिलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये सापडलेल्या मेफेड्रॉन ड्रग्सचं बॉलिवूडपर्यंत कनेक्शन आहे का? आणि हे ड्रग्स कुठून, कसं आणि कोणासाठी इथं आणलं होतं? तसेच अन्य कोणत्या शक्यता यामागे आहेत या सर्वांचा छडा लावून याच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे आयर्नमॅन म्हणून ओळखल्या जाणारे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केलंय. खबऱ्याच्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी खेड तालुक्यात सापळा रचला. तेव्हा चाकण-शिक्रापूर रस्त्यावर एक चारचाकी आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी धूम ठोकली अन पोलिसांनी पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली असता पाच आरोपींकडून त्यात 20 कोटींचे 20 किलो मेफोड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आलं. बेड्या ठोकलेल्या पाच आरोपींपैकी दोघे झारखंड आणि बिहारचे आहेत. पण सध्या ते नोएडामध्ये फार्मा डिस्ट्रिब्युटरचे काम करतात. तर अटकेत असलेले पुण्याच्या शिरूरमधील तिघांच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुटुंबीय ही चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. या ड्रग्स कनेक्शन मागे मोठी टोळी असल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत. आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊ आणि मग त्या चौकशीत याचा छडा लावला जाईल, असा पोलीस आयुक्तांनी दावा केलाय. एनसीबीच्या तपासात बॉलिवूडमधील मोठे मासे अडकलेत. त्यातच पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्सचे बॉलिवूड कनेक्शनची शक्यता आहे. त्यामुळे बॉलिवूडचं लक्ष या कारवाईकडे लागून आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
कोविड सेंटर करण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध
कोविड सेंटर करण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध
अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावरील गागरे हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला परिसरातील...
नगर तालुक्यात हॉटेलमध्ये दारूची अवैध विक्री करणाऱ्यांकडून पोलीस पथकास धक्काबुक्की
नगर तालुक्यात हॉटेलमध्ये दारूची अवैध विक्री करणाऱ्यांकडून पोलीस पथकास धक्काबुक्की
तालुका (प्रतिनिधी) अवैधरित्या दारू विक्री करणार्या हॉटेलवर...
मंत्रालय फसवणूक कॉल : मंत्रालय उड्डाणे स्वाधीनता सोडा नगरचा
नगर : मंत्रालय (Mantralaya ) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat) देण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्याने मुख्यमंत्री...
Karnataka Hijab Row : कर्नाटकात हिजाब वाद पुन्हा चिघळला, महाविद्यालयाकडून 23 विद्यार्थिनी निलंबित
Karnataka Hijab Row : कर्नाटकातील हिजाब घालण्याचा मुद्दा पुन्हा चिघळला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही मुस्लिम मुली तो मानायला तयार नाहीत....





