भाजपा : ऊस दरासाठी भाजपा आंदोलन

    190

    नेवासा : सन २०२२-२३ च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन तीन हजार रुपये दर मिळावा, या मागणीकरीता माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने (BJP) ज्ञानेश्वर कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दारावर धरणे आंदोलन केले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) म्हणाले, कारखान्याने सन २०२१-२२ च्या ऊस (sugar cane) बिलाचे एफआरपीतून ठेव म्हणून प्रतिटन १०९ रुपये कपात केलेले आहे, ते त्वरित परत करावे. तसेच सन २०२२-२३ च्या गळीत हंगमात गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन ३००० रुपये भाव द्यावा. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणारा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही मुरकुटे यांनी दिला.

    कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. कार्यकारी संचालक शेवाळे यांनी ऊस उत्पादकांना आवाहन केले की, डिस्टिलरी विस्तारीकीकरणासाठी भाग भांडवल म्हणून  प्रतिटन १०९ प्रमाणे घेण्यात आलेल्या परतीची ठेवीला कारखाना दरवर्षी व्याज देणार आहे. सदर ठेवीची पूर्ण रक्कम पाच वर्षानंतर परत करण्यात येणार आहे, तरी ठेव ठेवून डिस्टिलरी प्रकल्प उभारणीस सहकार्य करावे.

    यावेळी अंकुश काळे, मिरा गुंजाळ, भाऊसाहेब फुलारी, सचिन क्षिरसागर,अॅड. विश्वास काळे, ज्ञानदेव पाडळे, अरुण गरड,

    अशोक कोळेकर, ज्ञानेश्वर पेचे, अण्णासाहेब गव्हाणे, अनिल ताके आदी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here