महसूल : वारसा हक्कावर तस्करांचा प्राणघातक हल्ला

    219

    श्रीरामपूर: तालुक्यातील भेर्डापूर येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल (Revenue) पथकावर वाळूतस्करांनी विटा आणि दगडांनी प्राणघातक हल्ला (Attack) केला. या हल्ल्यात तलाठी शिवाजी दरेकर गंभीर जखमी झाले आहेत. मंडलाधिकारी बाळासाहेब वायखिंडे व तलाठी बाळासाहेब कदम यांनाही जबर मार लागला आहे. महसूल (Revenue) खात्याने जप्त केलेली वाळू रात्रीतून पळविण्याचा प्रकार घडत असल्याने ही कारवाई करण्यासाठी सदरचे पथक त्या ठिकाणी गेले होते.

    दरम्यान, पोलीस वेळेत न आल्याने महसूल पथकाला वाळू तस्करांनी बेदम मारहाण केली तसेच वाळूचा डंपरही पळवून नेला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.बाळासाहेब कदम मालुंजे येथील तलाठी असून भेर्डापूर हे गाव कदम यांच्या हद्दीत येते. दोन दिवसांपूर्वी कदम यांनी स्मशानभूमी जवळ १५ ते १६ ब्रास वाळूसाठा जप्त करत ग्रामपंचायतच्या ताब्यात दिला होता. बुधवारी (ता.३०) रात्री ही वाळू कुणीतरी डंपरमध्ये भरत असल्याची माहिती सरपंच अनिता चंद्रकांत कांदळकर यांनी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना दिली. त्यांनी तातडीने श्रीरामपूर तालुका पोलिसांना माहिती देत महसूलचे पथक भेर्डापूरकडे रवाना केले. त्यात उंदीरगावचे सर्कल बाळासाहेब वायखिंडे, तलाठी बाळासाहेब कदम आणि शिवाजी दरेकर यांचा समावेश होता. महसूल पथक पोहोचल्यानंतर काही लोक डंपरमध्ये वाळू भरत असल्याचे त्यांना दिसले. त्यांच्याकडे चौकशी करताच ते पळून गेले.

    याची माहिती महसूल पथकाने तहसीलदारांना दिली. नायब तहसीलदार वाकचौरे यांनी पोलीस उपनिरीक्षक निकम यांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले. तोपर्यंत एका जीपमध्ये काही लोक तेथे आले व त्यांनी महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. काहींनी विटा तसेच दगडाने मारहाण केली. डंपरची चावी शिवाजी दरेकर यांच्याकडे होती. त्यांना जबर मारहाण करून या लोकांनी त्यांच्याकडून डंपरची चावी हिसकावली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी महसूल पथकाला हल्लेखोरांच्या तावडीतून वाचविले. महसूल पथक श्रीरामपूरकडे रवाना झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे श्रीरामपूर तहसील व प्रांत अधिकारी कार्यालयात काम बंद आंदोलन करण्यात आले. महसूल विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here