आशिया कपला सुरवात! कोठे पाहता येणार उद्घाटन सोहळा

    120

    क्रिकेटप्रेमी आशिया कपची आतुरतेने वाट पाहत असतात. आता आशिया कप 2023 ची सुरूवात उद्यापासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून होत आहे. पहिला सामना हा यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होणार आहे. आशिया कप हा T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जातो. मात्र यंदा वनडे वर्ल्डकप तोंडावर असल्याने सराव व्हावा म्हणून आशिया कपही वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहेत. आशिया कपकडे वर्ल्डकपची रंगीत तालीम म्हणूनही पाहिलं जात आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप हा भारतात होणार असल्याने आशिया खंडातील संघांचे या वर्ल्डकपवर वर्चस्व असणार आहे. आशिया कपची फायनल 17 सप्टेंबरला कोलंबो येथे होणार आहे.

    आशिया कप उद्घाटन सोहळा कधी होणार?

    ▪️आशिया कप 2023 चा उद्घाटन सोहळा हा बुधवारी 30 ऑगस्टला होणार आहे.

    आशिया कपचा उद्घाटन सोहळा कोठे होणार?

    ▪️आशिया कप 2023 चा उद्घाटन सोहळा हा पाकिस्तानातील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

    उद्घाटन सोहळ्याची वेळ किती?

    ▪️पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कप उद्घाटन सोहळा हा पहिल्या सामन्यापूर्वी होणार आहे. सामन्याची सुरूवात ही दुपारी 3 वाजता होईल.

    कोणत्या टीव्ही चॅनलवर या उद्घाटन सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण?

    ▪️आशिया कप आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोट्सवरून होणार आहे. तसेच आशिया कपचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्ने हॉटस्टारवर होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here