हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या’ तारखेपासून पावसाची पुन्हा हजेरी,

    131

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. अशातच आता राज्यात 13 ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. तसेच राज्यात 15 ऑगस्टपासून सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

    अशातच राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र सातारा, सांगली, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, अकोला, जळगाव या जिल्ह्यात अजून पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आता 15 ऑगस्टपासून राज्यातील कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

    तसेच हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ऑगस्टपर्यंत राज्यात तूरळ‍क ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, चार ऑगस्टपासून तर नऊ ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here