आता डिसेंबरपर्यंत ITR भरल्यास नाही लागणार पेनल्टी

    129

    प्राप्तिकर रिटर्न फाईल करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने आयटीआर फाईल करण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली होती. आता 31 डिसेंबरपर्यंत आयकर भरता येतो. पण त्यासाठी 5000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण आता त्यात एक आनंदवार्ता आली आहे. केंद्र सरकारने करदात्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता अनेक करदात्यांना 31 जुलैनंतर पण ITR भरल्यानंतर कोणताचा दंड द्यावा लागणार नाही. प्राप्तिकर विभागाने याविषयीचा निर्णय घेतला आहे.

    नाही द्यावा लागणार दंड
    यावर्षी मुसळधार पावसाने उत्तर भारतातच नाही तर पश्चिम आणि दक्षिण राज्यात हाहाकार माजवला. इंटरनेट, वीज यंत्रणा कोलमडली. त्यामुळे अनेक करदात्यांना वेळेत प्राप्तिकर रिटर्न दाखल करता आला नाही. करदात्यांनी अंतिम मुदत वाढविण्याची विनंती केली होती. पण केंद्र सरकारने ही तारीख वाढवली नाही. सध्या आयटीआर फाईल करणाऱ्या करदात्यांना कोणताच दंड भरावा लागणार नाही, असे आयकर खात्याने स्पष्ट केले.

    विलंब शुल्क पण देऊ नका
    आयटीआर फाईल केला नसेल तर करदात्यांना दंडाची रक्कम भरावी लागते. सोबतच बिलेटेड आयटीआर फाईल करावा लागेल. पण त्यापूर्वी आयकर खात्याच्या या नियमांवर नजर टाका. या अधिनियमानुसार, डेडलाईन संपल्यानंतर आयटीआर दाखल करण्यासाठी करदात्यांना विलंब शुल्क देण्याची गरज नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here