
शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शेवगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस अधिक्षक बी.चद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तब्बल 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.02/08/2023 रोजी पहाटे 3/30 वा. चे सुमारास प्रभारी अधिकारी मा.सहायक पोलीस अधिक्षक श्री.रेड्डी सो यांनी तात्काळ स. पो. नि. आशिष शेळके, पो.हे.कॉ. नानासाहेब गर्जे, पो. कॉ. बप्पासाहेब धाकतोडे, पो.कॉ.राहुल खेडकर, पो. कॉ. गणेश गलधर यांना बोलावुन घेवुन मुंगी गावात अवैध वाळुचा भरलेला ढंपर चोरुन अवैध वाहतुक करत असलेबाबत माहीती देवुन तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगितले.
गु.र.नं 758/2023, कलम 379, पर्यावरण कायदा अधिनियम कायदा कलम 3, 15 खान खनिज अधिनियम 4,21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.2/08/2023 रोजी 5/10 वा. चे सुमारास मुंगी गावातील मुंगा देवी पेट्रोलपंपासमोर जाणारे मुंगी ते पैठण जाणारे रोडवर ढंपर रोडवरून जात असताना त्यास थांबविले असता डंपर थांबवुन त्यांस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गुलाब पठारे वय-47 वर्षे रा.दादेगाव ता.शेवगाव जि.अहमदगनर असे सांगितले. सदर ढंपर चालकास वाळू वाहतूकीच्या परवाना बाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. सदर ढंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर ढंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कौतुकास्प़द कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो ,मा.अपर पोलीस अधिक्षक सो श्री. प्रशांत खैरे साहेब ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील शेवगाव सो यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीसचे प्रभारी सहायक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, सपोनि/आशिष शेळके, सपोनि/विश्वास पावरा, पोहेकॉ/नानासाहेब गर्जे, पोना/रविंद्र शेळके, पोकॉ/बप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ/राहुल खेडकर, पोकॉ/गणेश गलधर पोकॉ/सुभाष खिळे यांनी सदरची कामगिरी केली आहे
ताजा कलम
शेवगांव पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध वाळु वाहणारांचे धाबे दणाणले आहे यात अनेक लोक आपले उखळ पांढरे करून घेत आहे पोलिसांच्या मागावर अनेक टिपर बसून असतात त्यांचे लोकेशन देण्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपये मोजले जातात शेवगांव शहरतील काही चौकात आणि स्पॉटवर बसलेले असतात त्यांच्या नाड्या आवळल्या तर मोठे रॅकेट बाहेर येईल
अविनाश देशमुख पत्रकार