राज्यात हॉटेल्सला रात्री 10 पर्यंत परवानगी
मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकार लॉकडाऊनमध्ये घातलेली अनेक बंधन हळूहळू शिथिल करत असल्याचे दिसून येत आहे.
याचाच एक भाग म्हणून आता राज्य सरकारने राज्यातील हॉटेल्स सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
नुकतेच राज्य सरकारने राज्यातील बार आणि रेस्तराँ यांच्याबाबतीतहि असाच निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता हॉटेल्सला देखील सवलत देण्यात आली आहे.
सरकारचे आवाहन : सरकारने हॉटेल्सला रात्री 10 वाजेपर्यंत उघडे ठेण्यास परवानगी दिली असली तरीही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक यंत्रणांना कोरोनाची परिस्थिती पाहून या निर्णयात बदल करता येईल असेही सरकारने नमूद केले आहे.