गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारा टेम्पो कोतवाली पोलीसांच्या ताब्यात गुन्हा दाखल..

    208

    दि.०८/०४/२०२३ रोजी रात्री ०९.४५ वाजण्याचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातून एक पांढ-या रंगाचा टेम्पो केडगावमार्गे पुण्याचे दिशेने जात असून त्यामध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतुक होत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोनि चंद्रशेखर यादव यांनी रात्रगस्तीवर असलेले सपोनि रविंद्र पिंगळे, पोकां/पोपट देव्हारे, पोकॉ अशोक कांबळे, पोकों गालफाडे, होमगार्ड पाटसकर यांना सदरबाबत माहिती कळवून खात्री करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे सपोनि पिंगळे यांनी पथकासह केडगांव येथील रंगोली हॉटेल जवळ सापळा लावुन खबरी प्रमाणे एक पांढ-या रंगाचा टेम्पोचा शोध घेतला असता काही वेळाने एक पांढ-या रंगाचा टेम्पो क्र. एमएच १२ क्यु जे ५१३९ हा संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आला. सपोनि पिंगळे व पथकाने सदर टेम्पोस थांबवुन टेम्पोमध्ये एकुन चार इसम बसलेले मिळुन आली त्यांना त्यांची नावे १) सागर दिपक आगळे २) विश्वास दिपक आगळे ३) संदिप रावसाहेब उमाप ४) जाकीर हमीद पठाण सर्व रा.नेवासा जि अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यांचे ताब्यातील टेम्पो वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये दोन खिलारी बैल व एक वासरु असे एकुन ७०,०००/- रु किचे गोवंशीय जनावरे मिळून आल्याने त्यांचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३३१ / २०२३ महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ) (१), ११(१) (ड) प्रमाणे पोकों/पोपट देव्हारे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाच पुढील तपास पोनि चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोना योगेश कवाष्टे हे करत आहेत,

    सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, पोको पोपट देव्हारे, पोकों अशोक कांबळे, पोकों अशोक गालफाडे, होम/पाटसकर यांनी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here