
जागतिक किडनी दिनानिमित्ताने फिटनेस फेस्ट किडनी पेशंट धावणार : डॉ सुहास बावीकर
योगा, मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन
नगर: सायक्लोथॉन धावण्याची स्पर्धा, विविध खेळ, योगा आणि मानसिक आरोग्य अशा भरगच्च उपक्रमांचे आयोजन जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमिताने आयोजित फिटनेस पेस्ट मध्ये करण्यात आले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगता येते तथापी मूत्रपिंडाचे आजार उद्भवूच नयेत यासाठी जिवनशैली कशी असावी यावर जनजागृती करण्याचा जागतिक मूत्रपिंड दिन साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचे सुमन किडनी फाऊंडेशनचे डॉ. सुहास बावीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९ मार्च हा जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने ५ मार्च रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन सुमन किडनी फाऊंडेशन, उत्कर्ष हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, जेआयआययू चे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स अॅण्ड रिसर्च आणि निझॉन ट्रेनिंग सिस्टीम यांच्यावतीने करण्यात आले आहे.५ मार्च रोजी औरंगाबाद येथील समता दर्शन हॉल येथे सकाळी १० वाजता वैद्रिय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल तर बदनापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मौलाना हुजेफा वस्तान्वी, डीन अझहर अहमद सिध्दीकी प्रमुख पाहुणे असतील एमआयटीचे अध्यक्ष मुनिष शर्मा अध्यक्षस्थानी असणार आहेत. डायलिसीसवर असलेले आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण रुग्णांसाठी छत्रपती संभाजीनगर सायकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली दोन, पाच आणि दहा किलोमिटर सायक्लोथॉन होणार आहे यावेळी निरोगी किडनीचा नारा देण्यात येणार आहे. किडनी दाते आणि रुग्णांसाठी शंभर मिटर धावण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. गायत्री कुलकर्णी योगाचे सत्र घेतील तर मूत्रपिंडरोग तज्ज्ञ डॉ. पुर्वा बाविकर मूत्रपिंड आणि आरोग्य यावर मार्गदर्शन करतील. गौरव निझॉन फिटनेस आणि खेळ यावर मार्गदर्शन करणार आहेत. अंकिता धारा आरोग्य आणि आहार विषयावर तर डॉ. निखिल खेडकर मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन करणार आहेत.
४ मार्च रोजी निरोगी किडनी आणि निरोगी हृदय हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन कार्यशाळा होणार आहे. हॉटेल मधुबन, बीड बायपास येथे होणा-या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. संतोष ढाकणे यांच्या भाषणाने होईल. औरंगाबाद फिजीशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पटणे निरोगी जिवनासाठी डॉक्टरांनी करावयाची जनजागृती, योग्य दिशा आणि आवश्यक तेथे उपचार कसे करावेत यावर मार्गदर्शन करतील. डॉ. पूर्वा aratकर निरोगी किडनीसाठी आहार आणि व्यायामाचे महत्व यासंदर्भात विवेचन करणार आहेत. खेळाडूंच्या फिटनेस संदर्भात इंग्लंडमध्ये अभ्यास करुन आलेले गौरव निझॉन टेनिस खेळाडूच्या फिटनेस संदर्भात मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रिकांत धनवले व्यायामाव्दारे हृदयाचे आरोग्य राखणे या विषयावर तर ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावकर किडनीविकारात रोगप्रतिकारक शक्ती चाचण्यांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त डॉक्टरांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन औरंगाबाद येथील एमआयटी हॉस्पिटलचेसंचालक डॉ. सुनिल देशपांडे, मुख्य वैद्यकीय कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष ढाकणे आणि सुमन किडनी फाऊंडेशनचे डॉ. सुहास बावीकर यांनी केले आहे.
चौकट—
मोफत आरोग्य चाचणी
किडनी आणि हृदयरोग टाळण्यासाठी आवश्यक चाचणीचे मोफत आयोजन ५ मार्च रोजी सकाळी आठ वाजेपासून समता दर्शन हॉल, अदालत रोड येथे करण्यात आले आहे. अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने बीएमआय, किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण, किडनीचे चलनवलन अशा वेगवेगळ्या चाचण्या यावेळी करण्यात येऊन त्याचा अहवाल संबंधित रुग्णास देण्यात येणार आहे. उत्कर्ष आणि एमआयटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ही तपासणी मोफत होणार आहे.