
अहमदनगर
व्यापार्यांसह सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या दि मर्चंटस को ऑप. बँकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते व बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक असलेले हस्तिमल मुनोत प्रणित जनसेवा पॅनेलने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवीत वर्चस्व अबाधित ठेवले आहे. विरोधक आणि त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांमध्ये काही हजारांत फरक आहे.
मर्चंट बँकेची निवडणुकीसाठी रविवारी दि. 26 रोजी मतदान झाले होते. गेल्या काही दिवसांपासून जनसेवा पॅनेलने ठिकठिकाणी सभा, मेळावे, भेटीगाठी घेऊन सभासदांना योजना सांगितल्या होत्या. सभासदांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा पूर्ण विश्वास टाकत भरघोस साथ दिल्याचे निवडणुकीतून समोर आले आहे. नगरमध्ये अर्बन मल्टिस्टेट बँकेशी व्यापार्यांचा संबंध होता. मात्र या बँकेची आताची अवस्था पाहता मर्चंटस बँकेबद्दल सभासदांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षात या अपेक्षा पूर्ण केल्याचे सभासदांनी निवडणुकीच्या माध्यमातून अधोरेखित केल्याचे मानले जाते.
सकाळी कल्याण रस्त्यावरील मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरूवात झाली. त्यानंतर निकाल बाहेर येऊ लागले. बहुतांश विरोधक मतमोजणी केंद्रावर फिरकले नसल्याचेही मुनोत समर्थकांनी सांगितले. सर्वसाधारण गटातील सर्व बारा जागांवर त्यांचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले. तशीच अवस्था महिला गटातही झाली. तेथेही जनसेवा पॅनेलच्या दोन्ही महिला मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.
विजयी झालेले उमदेवार आणि ज्ञुाशश्र त्यांना मिळालेली मते अशी;सर्वसाधारण प्रवर्ग ः हस्तीमल चांदमल मुनोत (7453), किशोर शांतीलाल गांधी (7457), संजीव झुंबरलाल गांधी (7177), संजयकुमार फुलचंद चोपडा (7389), अनिलकुमार हिरालाल पोखरणा (7600), मोहनलाल संपतलाल बरमेचा (7411), संजय शांतीलाल बोरा (7524), कमलेश पोपटलाल भंडारी (7577), अजय अमृतलाल मुथा (7425), अमित विजयकुमार मुथा (7437), आनंदराम चंदनमल मुनोत (7537), किशोर हस्तिमल मुनोत (7210). महिला प्रवर्ग ः प्रमिला बोरा (7710), मीनाताई मुनोत (7601). विमुक्त जाती, भटक्या जमाती, नागरिकांचा मागासवर्ग ः सुभाष मारूती भांड (7440). अनुसुचित जाती-जमाती प्रवर्ग ः सुभाष मोडालाल बायड (बिनविरोध).





