पाथर्डी शहरातील सोन्याचांदीचे व्यापारी श्री. बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर खुनी हल्ला

    214

    शेवगांव पाथर्डी शहरातील नवी पेठेतील सोन्या चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून शेवगांव रोड वरील अर्जुना लॉन्स च्या पाठीमागे असलेल्या घरी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला करून पैसे व सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग पळवविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. श्री. चिंतामणी यांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय परहार्डी येथे दाखल केले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे नेले आहे. दरम्यान या घटनेनचे वृत्त वाऱ्यासारखे पाथर्डी शहरात पसरले त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बाजारपेठे मधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पोलीस तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय आणि सामाजिक संघटना यां गोष्टीकडे केव्हा गांभीर्यपूर्वक पाहणार अशी चर्चा शहरासह तालुक्यात दबक्या आवाजात सुरु झाली आहे यां हल्ल्याच्या निषेधार्थ पाथर्डी शहर उद्या बंद ठेऊन यां भ्याड हल्ल्या च्या निषेधार्थ नाईक चौकात सकाळी 10 वाजता रस्ता रोको करण्यात येणार आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here