
रामजन्मभूमी संकुलाच्या शेजारी राहणारे मनोज कुमार यांना
2 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास फोनवरून राम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
अयोध्या पोलिसांना तपासात आढळून आले की, आरोपीने प्रेयसीच्या भावाला गोवण्यासाठी प्रेयसीचा मोबाइल नंबर वापरून नेट कॉलिंगद्वारे राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती.
अयोध्येचे सर्कल ऑफिसर (सीओ) एसके गौतम यांनी सांगितले की, मनोज कुमार यांना ज्या नंबरवरून कॉल आला होता त्या नंबरची पाळत ठेवून तपासणी करण्यात आली. अनिल रामदास घोडके ऊर्फ बाबा जान मुसा नावाच्या व्यक्तीने दिल्लीतील बिलाल याला त्याच्या नावाने नेट कॉल करून त्याला फसविण्याच्या उद्देशाने धमकावल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने महाराष्ट्र अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातून अनिल रामदास घोडके आणि त्याची पत्नी जरड संतान शनि ईश्वरा ऊर्फ आयर्न सॅटर्न हेल यांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांची सतत दिशाभूल करत होते. कधी तो स्वतःला चेन्नईचा, तर कधी महाराष्ट्राचा रहिवासी सांगत होता.
अयोध्याचे एसपी मधुबन सिंह यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्या फोनवर पहाटे 5 वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. तेव्हा मनोज यांनी संबंधिताला विचारले तुम्ही कोण आहास? कुठून फोन करत आहात? यावर मी दिल्लीहून फोन करत असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.
आरोपी म्हणाला होता की, ‘मी आज सकाळी 10 वाजता रामजन्मभूमी उडवून देईन.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून नऊ मोबाइल फोन, लॅपटॉप, दोन कुराण, दोन मुस्लिम टोप्या, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, चेकबुक, जन्म प्रमाणपत्र, निवडणूक आयोगाचे साधे फॉर्म, सुधारित आधार कार्ड, तावीज माला यासह इतरही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल रामदास घोडके ऊर्फ बाबा जान मूसा याने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. विशेष म्हणजे रामजन्मभूमीसोबतच त्याने दिल्ली मेट्रो स्टेशनलाही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.





