
मंगळुरू: येथील एका खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या एकूण 137 नर्सिंग आणि पॅरामेडिकल विद्यार्थी रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी मंगळवारी दिली.
या विद्यार्थ्यांना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे शहर पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असून सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अन्नातून विषबाधा होण्याचे कारण पाणी दूषित असल्याचे सांगितले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.