
अहमदनगर : शहरातील व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा
अहमदनगर शहरात घडत असलेल्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. बाहेरून काय मंडळी शहरातील जिल्ह्यातील तरुणांच्या भावना भडकविण्याचे प्रयत्न करीत आहेत. दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाला जातीय भांडण असे स्वरूप देण्यात येत आहे शहरातील व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले यावेळी हाजी शौकत तांबोळी, माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, अफझल पत्रकार,सय्यद वाहब, शफी जागीरदार ,अजीम राजे,राजू जागीरदार, आदी उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की या घटनांचा संदर्भ घेऊन काही मंडळी वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर सर्व मुस्लिम समाजाला टार्गेट धरून राजरोस विविध मुलाखतीत धमक्या देत आहेत व जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून तरुणांच्या भावना भडकवीत आहेत.काही मंडळींना शहरातील शांतता बघवत नाहीये त्यामुळे ते बाहेरून काय मंडळींना निमंत्रित करून मोर्चे, सभा, आंदोलने असे विविध भडकणारे कार्यक्रम आयोजित करत आहेत. वातावरण खराब करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन होत असताना त्याचे परिणाम काय होणार हे प्रशासनाला माहित आहे त्याबाबत योग्य ती दक्षता प्रशासनाने घेऊन शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित कशी राहील याबाबत प्रयत्न करणे फार आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे किंवा त्याबाबत षडयंत्र तयार करण्याऱ्या व्यक्ती वर योग्य ती कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे मग ती कुठल्याही समाजाची असो. तशी मागणी आम्ही करत आहोत. त्याबाबत सर्व प्रकारच्या सहकाऱ्याला आम्ही सदैव तयार आहोत.अशा प्रकारचे घटना घडल्यास त्याचा फटका सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग यांना बसेल व न भरून येणारे नुकसान होणार आहे. तरी प्रशासनाला लवकरात लवकर योग्य ती पावले उचलून शहरातील शांतता व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. वेळीच याबाबत योग्य ती पाऊले आत्ताच उचलणे आवश्यक आहे.