
शिवसेना, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे. विशेष म्हणजे केवळ शिवसेना पक्षच नव्हे तर उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख पदावर राहणार की नाही, यासंदर्भाची महत्त्वाची सुनावणी आज आयोगासमोर होणार आहे.





