अहमदनगर महानगरपालीका चे कर्मचारी राजेश प्रकाश तावरे यांनी दिनांक २५/११/२०२२ रोजी रात्री ९.०० वा चे दरम्यान कोठला स्टॅण्ड येथे डयुटी करीत असतांना शोएब शेख याचे बरोबर अॅनिमल वेष्ट टाकण्याच्या कारणावरून वाद झाला त्यामध्ये शोएब शेख याने माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांना बोलाविले. तदनंतर दंड भरण्याच्या कारणावरून मनपा कर्मचारी व यांच्यामध्ये वाद होवुन तावरे यांनी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक. शेख, शोएब व इतर तीन अनोळखी इस्मांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ तसेच धक्काबुक्की करून दमबाजी केल्याची तक्रार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे केली. सदर तक्रारीवर भिंगार कॅम्प पो.स्टे येथे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, व शोएब व इतर तीन अनोळखी इस्मांविरुद्ध भा.द.वि कलम ३५३, १४३, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर प्रकरणात शोएब शेख व मा. नगरसेवक मुदस्सर शेख यांनी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचेकडे अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला असता आरोपींच्या वतीने फिर्यादीच्या वैद्यकीय अहवालात कोणत्याही स्वरूपाची मारहाण न झाल्याबाबत युक्तीवादात स्पष्ट केले. सदर जामीन अर्जावर युक्तीवाद ऐकल्यानंतर सुनावणी होवुन दिनांक ०६/०१/२०२३ रोजी मा. न्यायालयाने शोएब शेख व माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांना अटी व शर्तीवर जामीन मंजुर केले. आरोपीच्या वतीने अॅड. श्रीराज वाळके यांनी युक्तीवाद केला त्यांना अॅड. हाजी बेग रफीक निजामभाई, अॅड. रियाज बेग, अॅड. अयाज बेग व अॅड. फैजान अकील शेख यांनी सहाय्य केले.
तसेच सदर प्रकरणाबाबत शोएब शेख यानी सुद्धा मनपा कर्मचारी विरुद्ध मा. एस.पी साहेब, अहमदनगर यांना मनपा कर्मचाऱ्यांनी मी माझा टेम्पो धेयुप दिनांक २५/११/२०२२ रोजी रात्री ८.०० वाजण्याचा सुमारास कोटला रोड ने जात असतांना १. राजेश प्रकाश तावरे, २. विशाल अशोक यांडागळे, ३, गणेश पांडुरंग घोरपडे यांनी माझा टेम्पो कोटला स्टॅण्डच्या आलीकडे अडविला व “तुझ्या टेम्पोमध्ये ठेवलेल्या गोण्यात वास येतोय, सामान खाली उतरय” असें म्हणुन शोएब याची गाडीतील गोण्या खाली उतरविल्या व गाडीचे व सामानाचे त्या तिघांनी फोटो काढले तसेच शोएब याला 5000 मागितले व त्याचे खिश्यातुन रु.२,०००/- काढुन घेतले. शोएब ने आरडाओरडा केल्यामुळे लोक जमा झाले तर त्यांनी शोएब याला धक्काबुक्की करून मारहाण केली. सदरचे तीनही इसम हे दारू पिलेले होते व स्वतःला अहमदनगर महानगरपालीकेचे कर्मचारी म्हणत होते. शोएब याची गाडी अडवून सरकारी पदाचा गैरवापर करत दारू पिऊन त्याचे खिशातील पैसे हिसकावुन घेतल्याबाबत तक्रार अर्ज शोएब शेख याने दिलेला आहे








