
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने पुणे विभागामध्ये 5990 परवडणारी घरी उपलब्ध करून दिली असून त्याची जाहिरात देखील निघाली आहे. हे जे काही एकूण 5990 घरे आहेत.त्यापैकी 2908 घरे प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर विकली जाणार आहेत.
तर उरलेली घरे म्हाडा पुणे मंडळांनी आयोजित केलेल्या लॉटरीच्या माध्यमातून विकली जाणार आहेत. या लॉटरीचा निकाल 17 फेब्रुवारीला जाहीर होणार असून तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असाल तरी तुम्हाला या अंतर्गत अर्ज करता येणार आहे. या घरांची वैशिष्ट्ये पाहिले तर यामध्ये जे व्यक्ती घर घेतील त्यांचे उत्पन्न विचारात घेऊन घरांचा आकार आणि किंमत ठेवण्यात आली असून अनेक श्रेणींमध्ये तब्बल 5990 घरे विक्रीसाठी आहेत.
शेती बातम्या,सरकारी योजना,शेती कायदे, पशु संवर्धन विषयक मोफत माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जर आपण यामध्ये उत्पन्न गटांचा विचार केला तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग अर्थात ई डब्ल्यू एस, निम्न उत्पन्न गट अर्थात एलआयजी, मध्यम उत्पन्न गट अर्थात एमआयजी आणि उच्च उत्पन्न गट अर्थात एचआयजी आदी गटांमध्ये विभागला गेला आहे.
हे आहे ऑनलाइन अर्ज भरणे व स्वीकृतीचे वेळापत्रक
1- ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची अर्जाची सुरुवात– 5 जानेवारी 2023 दुपारी बारा वाजता
2- ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख व वेळ– 6 फेब्रुवारी 2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत
3- सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख व वेळ– सात फेब्रुवारी 2023 रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत
4- ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्याची अंतिम तारीख– आठ फेब्रुवारी 2023
5- बँकेत आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक– 9 फेब्रुवारी 2023
6- सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी– 16 फेब्रुवारी 2023 सायंकाळी सहा वाजेपर्यंत
7- सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी– 20 फेब्रुवारी 2023 सायंकाळी सहा वाजेपर्यंत
6- सोडत दिनांक– 24 फेब्रुवारी 2023 सकाळी 10 वाजेपर्यंत
7- सोडती मधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तारीख– 24 फेब्रुवारी 2023 सायंकाळी सहा वाजता
याप्रकारे ऑनलाइन सोडतीचे वेळापत्रक आहे.
नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी
यासाठी आपण लागणारे कागदपत्रांचा विचार केला तर पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान, पासपोर्ट फोटो( 50 केबी पर्यंत ), मोबाईल क्रमांक ( व्हाट्सअप सह) व ईमेल आयडी
पात्रता निकष
1- अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून स्वतःच्या, पत्नीच्या अथवा ज्ञान मुलांच्या नावे मालकी तत्त्वावर भूखंड अथवा निवासी गाळा घेतला नसल्याबाबतचे तसेच कोणतेही शासकीय गृहनिर्माण संस्थेचा सभासद नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे( सदर आठ ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी लागू नाही.)
एकंदरीत या घरांचे स्वरूप
यामध्ये प्रत्येक फ्लॅटचा आकार 300 चौरस फुट ते 600 चौरस फुटांपेक्षा जास्त आहे. जर क्षेत्रफळानुसार त्यांचे किंमत तिचा विचार केला तर 13 ते 60 लाख रुपयांच्या दरम्यान ही किंमत असून हे सर्व घरे पुणे आणि पिंपरी चिंचवड च्या दरम्यान आहेत. जर आपण म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्याचा विचार केला तर ही पहिलीच लॉटरी असेल जी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने काढली जाणार आहे.
यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन देखील प्राधिकरणाने लॉन्च केले असून त्या माध्यमातून लोक यासाठी नोंदणी करू शकतात आणि लॉटरी प्रणालीच्या माध्यमातून घर खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकतात. एकदा यामध्ये ऑनलाईन नोंदणी झाली की अर्जदाराला त्याच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात. पडताळणी नंतरच अर्जदार लॉटरी सहभागी होण्यास पात्र ठरतील.
आधी येणाऱ्यास दिले जाईल प्राधान्य
माडाच्या 5990 घरांपैकी 2908 घरेही लॉटरी शिवाय विकली जाणार असून किंवा पूर्वीच्या लॉटरीत खरेदीदार न मिळालेल्या या 2908 सदनिकांची यावेळी आधी येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. याबाबत माडाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, हे फ्लॅट आधीच्या लॉटरी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर त्यांची विक्री केली जाणार आहे.




