
नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील झोपडपट्टीला आज संध्याकाळी भीषण आग लागली. नोएडाच्या सेक्टर 93 येथील गेझा गावात ही घटना घडली आहे.
अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या किमान डझन गाड्या घटनास्थळी आहेत.




