मुश्रीफ यांच्याशी पंगा घेणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांची तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली कऱ्हाड

1400

मुश्रीफ यांच्याशी पंगा घेणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांची तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली

कऱ्हाड : गुंडांमध्ये वचक निर्माण करणाऱ्या सिंगम स्टाईल पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची वर्षातच तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली झाली. त्याला राजकीय वादाची झालर असून दोन वर्षापूर्वी कोल्हापूर येथे महापौर निवडी वेळी ज्येष्ठ नेते व विद्यमान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेला वादाचे पडघम आत्ताच्या बदली मागे ही आहेत. मात्र, चांगल्या कामाचे सरकारने सुरज गुरव यांना गिफ्ट दिल्याची ही पोलिस वर्तूळात चर्चा आहे. पोलिस उपअधीक्षक गुरव यांची कऱ्हाडला वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019 मध्ये बदली झाली. हजर झालेल्या दिवशीच त्यांनी त्यांची भुमिका स्प्ष्ट केली. स्वागताला येणाऱ्यांचा बायोडाटा आधीच समोर ठेवत त्यांना नीट वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नवीन आहेत, बघू असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किमान डझनभर कुख्यात गुंडाना श्री. गुरव यांनी खाकी स्टाईलने सरळ केले. पोलिस खात्यात हटके काम केल्याने श्री. गुरव यांचा चांगलाच गवगवा झाला. पोलिस उपअधीक्षक गुरव यांची कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली होती. दोन वर्षापूर्वी महापौर निवडीवेळी त्यांचा कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. हमरीतुमरीपर्यंत गेलेल्या वादाची त्यावेळी राज्यभर चर्चा झाली होती. त्यावेळी तेथून श्री. गुरव यांची तडकाफडकी चिपळूणला बदली झाली होती. तेथे वर्षभर काम करतात तोच तेथूनही त्यांची थेट कऱ्हाडला बदली झाली. कऱ्हाडमध्ये त्यावेळी स्थिती हातळण्याची कसोटी होती. भर चौकात गुंडाचा गोळ्या घालून खून झाला होता. त्याच्या तपासापासून गुंडगिरीवर पोलिसांचे नियंत्रण आणण्याची कार्यवाही त्यांनी केली. त्यामुळे त्यांचे नावही झाले. त्या चांगल्या कामाचे गिफ्ट त्यांना मिळाले. येथे येऊन वर्षभराचा कालवधी पूर्ण होतोय त्याला चार दिवसही होत नाहीत, तोच त्यांची बदली नागपूरला सहायक पोलिस आयुक्तपदी झाली आहे. त्यामागे दोन वर्षापूर्वी झालेल्या वादाची झालर असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here