
राज्यात पोलिसांची 20 हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य पोलिस मुख्यालयाने 2021 मधील रिक्त पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे.
मुंबई पोलिस दलात 6740, तर पूर्ण राज्यात 14,956 पोलिस शिपाई पदे रिक्त आहेत. त्यात खुल्या प्रवर्गात 5468 पदांचा समावेश आहे. पोलिस भरतीसाठी एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध होईल. 3 ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले जातील.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करता येणार नाहीत. चुकीची माहिती दिल्यास, कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी अर्ज बाद केला जाऊ शकतो.
कुठे किती जागा..?
▪️ मुंबई – 6740
▪️ ठाणे शहर – 521
▪️ पुणे शहर – 720
▪️ पिंपरी चिंचवड – 216
▪️ मिरा भाईंदर – 986
▪️ नागपूर शहर – 308
▪️ नवी मुंबई – 204
▪️ अमरावती शहर – 20
▪️ सोलापूर शहर- 98
▪️ लोहमार्ग मुंबई – 620
▪️ ठाणे ग्रामीण – 68
▪️ रायगड -272
▪️ पालघर – 211
▪️ सिंधूदुर्ग – 99
▪️ रत्नागिरी – 131
▪️ नाशिक ग्रामीण – 454
▪️ अहमदनगर – 129
▪️ धुळे – 42
▪️ कोल्हापूर – 24
▪️ पुणे ग्रामीण – 579
▪️ सातारा – 145
▪️ सोलापूर ग्रामीण – 26
▪️ औरंगाबाद ग्रामीण- 39
▪️ नांदेड – 155
▪️ परभणी – 75
▪️ हिंगोली – 21
▪️ नागपूर ग्रामीण – 132
▪️ भंडारा – 61
▪️ चंद्रपूर – 194
▪️ वर्धा – 90
▪️ गडचिरोली – 348
▪️ गोंदिया – 172
▪️ अमरावती ग्रामीण – 156
▪️ अकोला – 327
▪️ बुलढाणा – 51
▪️ यवतमाळ – 244
▪️ लोहमार्ग पुणे – 124
▪️ लोहमार्ग औरंगाबाद -154
*एकूण – 14956



