मुकुंदनगर भागातील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी. माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसहाक यांचे आयुक्तांना निवेदन

556
  • अहमदनगर – मुकुंदनगर भागात साथीच्या रोगांनी गेल्या अनेक दिवसांपासून थैमान घातले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात तातडीने औषध फवारणी करण्याची गरज आहे, तसेच व्हॉल्व्ह व जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त व मैलामिश्रित पाणी येत आहे. पावसाचे नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याने त्यांचे आतोनात हाल होत असून, मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या भागातील ड्रेनेजलाईन व नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे, याबाबतचे निवेदन माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसहाक यांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांना दिले आहे. यावेळी मुकुंदनगरमधील नागरिक शेख फारूक गुमाव, जमीर इनामदार, शेख रऊफ, सय्यद शहेबाज आदी उपस्थित होते
  • निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुकुंदनगर भागात जागोजागी खड्डे पडले असून, या डबक्यांमध्ये पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने गढूळ व मैलामिश्रित पाणी येत आहे. प्रत्येक घरात सर्दी, खोकला, ताप, उलट्या व जुलाबाने हैराण झाले असून, रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन संपूर्ण परिसरात औषध फवारणी केल्यास डासांची उत्पत्ती कमी होऊन साथीचे रोग कमी होण्यास मदत होईल.
  • लिकेज जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ड्रेनेज व गटारसफाई काम न केल्याने अनेक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. परिणामी पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरत आहे. पाऊस असला की नागरिक रात्ररात्र जागून काढतात. मुकुंदनगर परिसरातील ड्रेनेजलाईन व नाले साफसफाईचे काम तातडीने हाती घ्यावे. ज्या भागात घरात पाणी शिरते त्या भागातून कामास सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
  • मा. संपादक,
  • दै.
  • अहमदनगर. कृपया प्रसिद्धीसाठी.
  • मुकुंदनगर परिसरातील विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले असून, तातडीने येथील नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, या मागणीचे निवेदन आयुक्त पंकज जावळे यांना माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसहाक यांनी दिले. यावेळी मुकुंदनगरमधील नागरिक शेख फारूक गुमाव, जमीर इनामदार, शेख रऊफ, सय्यद शहेबाज आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here