Mumbai Rain : मुंबईत विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

397

Mumbai Rain : राज्यात अनेक ठिकाणी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावलीय. मुंबईसह उपनगरात जोरदार (Mumbai Rain Update) पाऊस पडत आहे तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडतोय. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने चांगलीच कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगली तारांबळ उडाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र संध्याकाळी वाजल्यानंतर अचानक ढग आले आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही तुफान पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संध्याकाळी घरी जाण्याची वेळ असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळाली आहे.

कोकणातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलीय. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विक्रमगड जव्हार मोखाडा भागात जोरदार पाऊस सुरू आहे तर पालघर जिल्ह्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे.

राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे

रत्नागिरी पाऊसकाही दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा रत्नागिरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. या पावसामुळे तालुक्यातील काही गावात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. चिपळूणमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. तर खेड, दापोलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here