भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 10 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून, तर 10 ते 12 प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती जण होते याची ठोस माहिती अद्यपपर्यंत मिळू शकलेली नसून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. नर्मदा नदीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढली आहे. बसचा फक्त सांगाडा उरला आहे. बसची अवस्था पाहून अपघातीची तीव्रता किती असेल याचा अंदाज येत आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
कर्नाटकच्या मंत्र्याने ‘एलओपी’ नियुक्त केल्याबद्दल HDK चे अभिनंदन केले
कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते एम बी पाटील यांनी सोमवारी जेडी (एस) नेते एचडी कुमारस्वामी यांचे "अभिनंदन"...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांचा पुढाकार, उभारले ११०० बेड्सचे अद्ययावत कोविड सेंटर
राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने तसेच निलेश लंके...
पहा: मणिपूर हिंसाचारावर लष्कराची ‘आय इन द स्काय’
नवी दिल्ली: मणिपूरमधील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) तैनात केली आहेत कारण...
‘कोणतीही भरपाई नाही’: नितीश बिहार हौच मृत्यू, शोकांतिका; भाजपचा निषेध मोर्चा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांचे सरकार बनावट/बेकायदेशीर दारू पिऊन मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक...




