अहमदनगर येथील गोल्ड काउन्सिलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी संबंधित तक्रारदार उद्योजकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमतीपत्र करिता अर्ज नाशिक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २ मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी (वय ५७, रा. औरंगाबाद), क्षेत्र अधिकारी संशयित कुशल मगननाथ औचरमल (वय ४२) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.अहमदनगर येथील गोल्ड काउन्सिलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी संबंधित तक्रारदार उद्योजकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमतीपत्र करिता अर्ज व मूळ कागदपत्रे दाखल केली होती. यानंतर औरंगाबाद येथील प्रादेशिक अधिकारी तथा नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त पदभार सांभाळणारे वर्ग एकचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी व नाशिक येथील कार्यालयातील क्षेत्र अधिकारी कुशल औरचमल यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी १५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालय गाठून हकीगत सांगत तक्रार अर्ज दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांनी गंभीर दखल घेत तक्रारीची पडताळणी करत सापळा कारवाईचे आदेश दिले. यानंतर पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरूड आदींच्या पथकाने सापळा रचला. लाचखोर जोशी व औरचमल यांनी तक्रारदाराकडून प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच पंचांसमक्ष सातपूर जवळील उद्योग भवनातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात स्वीकारली. यावेळी सापळा कारवाईच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सातपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. यावर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अद्यापपर्यंत झालेली ही पहिलीच सापळा कारवाई आहे. दोन वर्षांपुर्वी अशाच प्रकारे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.औरंगाबाद येथे मुळ नेमणूक ; नाशिकचा अतिरिक्त पदभारप्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी यांची नेमणूक औरंगाबादच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपविण्यात आला होता. यादरम्यान, संमतीपत्र करिता दोघा अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बेकायदेशीरपणे रक्कम अर्जदाराकडून स्वीकारली. यामुळे पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
“सॅक प्रेसिडेंट, समन मिनिस्टर”: मालदीवच्या विरोधकांनी पंतप्रधान मोदींचा बचाव केला
नवी दिल्ली: मालदीवचे खासदार अली अझीम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकाटिप्पणीवरून वाद वाढत असताना मोहम्मद मुइज्जू...
मटकी खाण्याचे फायदे: ...
अनेक ठिकाणी मिसळ करताना मटकी वापरली जाते. त्यामुळे अनेकांच्या आवडत्या कडधान्यांमध्ये मटकीचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. परंतु या...
वर्धा जिल्हयात यावर्षी 1 हजार हेक्टरवर फळबाग लागवड
• 600 हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण• 1233 शेतक-यांना मिळणार लाभ• कृषीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
वर्धा, दि.9 (जिमाका) : महात्मा गांधी...
अहमदनगर महानगरपालिका दि. १९/०६/२०२१ रोजी अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या महत्वाच्या...
अहमदनगर महानगरपालिकादि. १९/०६/२०२१ रोजी अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठायोजनेच्या महत्वाच्या कामासाठी शट डाउन घेत असले बाबत…
...






