‘मी पुन्हा येणार’ची लगबग सुरु, ……..

मी पुन्हा येणार’ची लगबग सुरु, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांचा जल्लोषउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलंउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सराकर अल्पमतात आलं होतं. त्यामध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिद्ध करा, असे निर्देश काढले. त्याविरोधात महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवानात दाखल होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here