अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर:

मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने अटक केलेल्या एफआयआरमध्ये जामीन मंजूर केला आहे

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती.

पण आता केतकीला जामीन मंजूर झाला आहे. :

मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने अटक केलेल्या एफआयआरमध्ये जामीन मंजूर केला आहे.

केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली होती.

केतकी चितळे विरोधात 14 मे रोजी कळवा पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी समर्थकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केतकीला अटक झाली.

आता केतकीचा जामीन मंजूर झाला असून उद्या 23 जून रोजी उद्या ठाणे कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

केतकीचा 40 दिवस तुरुगांत मुक्काम होता.केतकीवर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशीची मागणी केतकीच्या वकिलांनी राज्यपालांकडे केली होती.

तर पोस्टाद्वारे गुन्हा दाखल करण्याचा न्यायालाने सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता.

काय आहे प्रकरण?

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत 14 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली होती. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला होता. आता केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here