Prophet Muhammed Row : नुपूर शर्मांच्या आडचणीत आणखी वाढ, पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल

379

Prophet Muhammed Row : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झालाय. देशभरात शर्मा यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत तर अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. नुपूर शर्मा यांच्यावर आता पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. टीएमसी अल्पसंख्याक सेलने पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूरमधील कोंटाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथील कोंटाई पोलीस ठाण्यात नुपूर शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आल्यानंतर पोलिनींना कलम 153(अ), कलम 504, कलम 505(२), कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यांतर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी नुपूर शर्माला दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. नुपूर शर्माला मुंबई पोलिसांनी 25 जूनला तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.मुंबई आणि ठाण्यातही गुन्हे दाखलनुपूर शर्माविरुद्ध मुंबई, ठाणे आणि पायधोनी येथेही गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्माला समन्स बजावले आहे. ठाणे पोलिसांनी नुपूरला 22 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. पायधोनी येथे नुपूर शर्मा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रझा अकादमीने त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता.नुपूर शर्माविरुद्ध दिल्लीतही गुन्हा दाखल नुपूर शर्माविरोधात दिल्लीतही गुन्हा दाखल आहे. दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, वादग्रस्त संत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या सर्वांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी आणि सोशल मीडियावर लोकांना भडकावणारे संदेश पोस्ट आणि शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती देताना दिल्ली पोलीस पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितले की, सोशल मीडियावर इतर धर्मांबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here