दुचाकी चोरास नगर तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!
दुचाकीचे सुट्टे भागा करून विक्री…
नगर प्रतिनिधी
नगर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल होता. सविस्तर माहिती प्रमाणे दि.१ एप्रिल रोजी नेप्ती कांदा मार्केट परिसरातुन राहुल भाऊसाहेब बोरकर यांच्या स्वमालकीची दुचाकी चोरीस गेली होती. त्या संदर्भात नगर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १९९/२२ प्रमाणे भारतीय दंड विधान कलम प्रमाणे ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
दि.८ जुन रोजी गोपनीय सूत्र कडुन खात्रीशीर माहिती उपलब्ध झाल्याने आरोपी नामें अनिल बापु भोंगे (वय ३१ ) राहणार वडगाव गुप्ता यांस ताब्यात घेण्यात आले. सदर दुचाकीचे सुट्टे भाग करून ठेवलेली दुचाकी वाहन क्रमांक एम एच १६ बी.ए ६९८२ त्यांच्याकडुन जप्त करण्यात आली आहे.आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कामगीरी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साह्य.पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप, पोलिस हवालदार थोरात, पोलिस नाईक राहुल शिंदे, महिला पोलिस कर्मचारी जयश्री फुंदे, पोलिस हवालदार साठे,या नगर तालुका पोलिस स्टेशनच्या पथकाने सदर कामगिरी केली आहे. नगर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या घटना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.



