Maharashtra Corona Update : राज्यातल्या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, सात दिवसात 130.84% वाढ

480

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय आणि त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं बैठकीत चर्चा झाली.

गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84. % ची वाढ झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे हे पात जिल्हे नवे हॉटस्पॉट. ठरत आहेत. 4.31 % लक्षणे असलेले रुग्णांना रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. 95 % रुग्णांना लक्षणे नाहीत तर 1.04% रुग्ण गंभीर आहेत

  • सर्वाधिक रुग्णसंख्यावाढीचे पहिले पाच जिल्हे
  • मुंबई
  • 30 मे ते 5 जून – 4880 रुग्ण
  • 23 ते 29 मे – 2070 रुग्ण
  • 135.75 % वाढ
  • ठाणे
  • 30 मे ते 5 जून – 1245 रुग्ण
  • 23 ते 29 मे – 427 रुग्ण
  • 191.57 % वाढ
  • पुणे
  • 30 मे ते 5 जून – 538 रुग्ण
  • 23 मे ते 29 मे – 357 रुग्ण
  • 50.70 % वाढ
  • रायगड
  • 30 मे ते 5 जून – 244 रुग्ण
  • 23 ते 29 मे – 106 रुग्ण
  • 130.19 % वाढ
  • पालघर
  • 30 मे ते 5 जून – 144 नवे रुग्ण
  • 23 ते 29 मे – 32 नवे रुग्ण
  • 350.00 % वाढ

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी एका पत्रकाद्वारे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. मास्क सक्ती नाही मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात आलं होतं. राज्यात सोमवारी 1036 कोरोना रूग्णांची नोंदआज राज्यात 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,38, 938 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.03 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here