Monsoon arrival : खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती

342

Monsoon arrival : सर्वांसाठीच एक खुशखबर देणारी बातमी आहे. अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. मान्सून काही काळ श्रीलंकेच्या वेशीवर अडकला होता मात्र, अखेर तो आज केरळमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान, पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यावर्षी वेळेआधीचं मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं देशातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होत असतो. यंदाही 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तो मुंबई, पुणे अन्य ठिकाणी पाऊस बरसणार आहे. जूनमधील मान्सूनचा प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असेल, त्यानंतर तो सर्वत्र बरसेल अशी स्थिती दिसत आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं चांगलेची हजेरी लावल्याचे दिलसत आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. तसेच मुंबईच्या परिसरात देखील हलका पाऊस झालाआहे.

लगेच मोठ्या पावसाची अपेक्षा ठेवणं योग्य नाहीमान्सून आगमन जाहीर करताना भारतीय हवामान विभागाचे काही निकष असतात. ते निकष पूर्ण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये बऱ्यापैकी सर्वत्र पाऊस झाल्यानं मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागानं जाहीर केल्याची माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये केरळच्या उत्तरेकडे परिस्थिती अनुकूल नाही. सध्या वाऱ्यांची दिशा वायव्येकडून आहे. ती नैऋत्येकडून असणे गरजेचे आहे. त्यामुळे लगेच मोठ्या पावसाची अपेक्षा ठेवणं योग्य ठरणार नसल्याचे प्रभुणे यांनी सांगितलं.

आज सकाळी सकाळी साडेआठ वाजता केरळ राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या आकाश अंशतः ढगाळ असल्याची माहिती हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here