आंघाेळ करताना तरुणींचे चित्रीकरण, अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल; राजापुरातील घटना

आंघाेळ करताना तरुणींचे चित्रीकरण, अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल; राजापुरातील घटना

पीडित तरुणी अंघोळीसाठी गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल व कॅमेरा दिसला.

राजापूर : मुंबईहून आपल्या मामाच्या गावी आलेल्या तरुणींचे अंघोळ करताना मोबाईलच्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचा लाजिरवाणा प्रकार आंगले-शिंदेवाडी (ता. राजापूर) येथे बुधवारी घडला.

याप्रकरणी अल्पवयीन युवकाच्या विरोधात राजापूर पोलिसांनी भादंवि कलम ३५४ सी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पीडित तरुणी मूळ सिंधुदुर्गातील व सध्या नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्याला आहे. ती आपल्या कुटुंबासह आंगले-शिंदेवाडी येथील मामाच्या घरी उन्हाळी सुट्टीत राहण्यासाठी आली होती.

मामाचे घर साधे आहे. ही पीडित बुधवारी सकाळी तरुणीच्या मावशीची मुलगी तसेच बहीण अंघोळ करून बाहेर आल्या. त्यानंतर पीडित तरुणी अंघोळीसाठी गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल व कॅमेरा दिसला.

तिने आरडाओरड केली असता कुटुंबीयांनी धाव घेतली. त्यानंतर घराच्या बाथरूमला लागून असलेल्या घरात जाऊन पाहिले.

त्यावेळी घरात कुणी राहत नसताना त्या घरात एक युवक लपून बसल्याचे त्यांनी पाहिले. या युवकाचा मोबाईल तपासला असता, मोबाईलच्या रिसायकल बिनमध्ये पीडित तरुणीचे अंघोळ करताना शूटींग केलेले दोन व्हिडीओ आढळले.

पीडितेने आरडाओरड केल्यानंतर त्याने व्हिडीओ डिलीट केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here